Monday, June 24, 2024 07:05:13 PM

make-a-peel-off-mask-at-home
'पीलऑफ मास्क' बनवा घरच्या घरी

पीलऑफ मास्क बनवा घरच्या घरी

मुंबई ,१२ जुलै २०२३ , प्रतिनिधी : आपल्या त्त्वचेची काळजी घेण्यासाठी सहसा आपण बरीच महागडी उत्पादनं वापरत असतो. बऱ्याचदा आपण बाजारातून महागडे 'पील ऑफ मास्क' 'विकत घेत असतो परंतु आपण हेच पीलऑफ मास्क आता घरीच बनवू शकतो. आता हे मास्क बनवायचे कसे ? जाणून घेऊया. दैनंदिन जीवनात 'पीलऑफ मास्क' खूप गरजेचे आहे. प्रामुख्याने याचा वापर चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी केला जातो. पीलऑफ मास्क वापरण्याचे फायदे : १) त्वचा तजेलदार आणि मऊ ठेवण्यासाठी पीलऑफ मास्कचा वापर केला जातो. 'डेड स्किन सेल्स' या मास्कच्या मदतीने काढले जाऊ शकतात. तसेच चेहऱ्यावरील बंद छिद्र उघडण्यासाठी करण्यास मदत करतात. २) पीलऑफ मास्क चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावर असलेली अशुद्धता दूर होते आणि नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते.

"पीलऑफ मास्क " साहित्य :
१. एक मोठा चमचा चारकोल पावडर २. एक मोठा चमचा मुलतानी माती ३. एक मोठा चमचा जिलेटिन ४. एक मोठा चमचा पाणी

कृती :

एका वाटीत एक मोठा चमचा चारकोल पावडर, एक मोठा चमचा मुलतानी माती एक मोठा चमचा जिलेटिन आणि एक मोठा चमचा पाणी एकत्र घेऊन ते एकजीव करा. त्याची पेस्ट तयार करून घ्या. तयार झालेला मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून हळूहळू तो मास्क काढून टाका.

कॉफी पीलऑफ मास्क

सामग्री :

१. एक चमचा कॉफी पावडर २. एक चमचा जिलेटिन ३. एक चमचा मध ४. पाणी

कृती :

एका मोठ्या वाटीत एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात एक चमचा जिलेटिन , एक चमचा मध आणि पाणी एकत्र करा. त्याची पेस्ट तयार करा. १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवून हळू हळू तो मास्क काढून टाका.  


सम्बन्धित सामग्री