मुंबई,१९ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया सोमवारी, २० मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला पोलिसांनी १९ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २७५२ पोलिस अधिकारी, २७४६० पोलिस अंमलदार, ६२०० होमगार्ड, तीन दंगल नियंत्रण पथक (आरसीपी), ३६ केंद्रीय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.