Travel Insurance Benefits: पर्यटन स्थळांना भेट द्यायला सर्वांनाच आवडते. कोविड महामारीनंतर देशात प्रवासाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. लोक केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पर्यटनासाठी जात आहेत. आतापर्यंत तुम्ही जीवन विमा, आरोग्य विमा, मुदत विमा आणि गृह विम्याबद्दल खूप ऐकले असेल. पण तुम्ही कधी प्रवास विमा घेतला आहे का? ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. हा विमा तुम्हाला अनेक प्रकारच्या जोखमींपासून संरक्षण देतो. यदाकदाचित तुम्ही ट्रीपला गेला आणि जर तुमचा अपघात झाला तर अशा परिस्थितीत, तुम्हाला प्रवास विमा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग आज या लेखातून प्रवास विम्याचे फायदे जाणून घेऊयात.
वैद्यकीय खर्च -
प्रवासादरम्यान जर तुम्ही कोणत्याही अपघाताचे बळी पडलात तर प्रवास विमा तुम्हाला खूप मदत करू शकतो. प्रवास विमा घेतल्याने तुम्हाला अपघात, स्थलांतर, वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी कव्हर मिळते.
हेही वाचा - पीएम इंटर्नशिपसाठी पुन्हा अर्ज सुरू! दरमहा मिळणार 5 हजार रुपये
ट्रिपमधील बदल -
वेगवेगळ्या परिस्थितींमुळे, बऱ्याचदा आपल्याला इच्छा नसतानाही आपल्या प्रवासाच्या योजनांमध्ये बदल करावे लागतात. आरोग्य बिघडल्यामुळे, फ्लाइट रद्द झाल्यामुळे किंवा हॉटेल बुकिंग रद्द झाल्यामुळे. त्यामुळे तुमच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल झाल्यास, विमा कंपनी त्याची भरपाई करते.
हेही वाचा - Damaged Notes from ATM : एटीएम मधून फाटकी नोट मिळाली तर काय करायचं? काय आहे RBI चा नियम?
वैयक्तिक जबाबदारी -
प्रवासादरम्यान, जर विमाधारक व्यक्तीने तृतीय पक्षाचे कोणतेही आर्थिक नुकसान केले तर अशा परिस्थितीत प्रवास विमा तुम्हाला खूप मदत करू शकतो. अशा परिस्थितीत, विमा कंपनी तुमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करते.
सामान कव्हरेज -
चेक-इन केलेले सामान प्रवास विम्याअंतर्गत येते. प्रवासादरम्यान तुमचे कोणतेही सामान हरवले तर तुम्ही या प्रकरणात दावा करू शकता.