Friday, February 21, 2025 08:06:05 PM

RVNL share Price Increase
शेअर बाजारातील मंदीत ‘रेल्वे’ची चांदी, एका बातमीने RVNL शेअरला मिळाली बुलेट स्पीड

भारतीय शेअर बाजारात सध्या मंदीचे वादळ सुरु असताना, गुंतावूनदारांचे पोर्टफोलीओही हादरले आहेत. मात्र, या गडगडत्या बाजारातही काही स्टॉक्स गुंतवणूकदारांना दिलासा देत आहेत.

शेअर बाजारातील मंदीत ‘रेल्वे’ची चांदी एका बातमीने rvnl शेअरला मिळाली बुलेट स्पीड

भारतीय शेअर बाजारात सध्या मंदीचे वादळ सुरु असताना, गुंतावूनदारांचे पोर्टफोलीओही हादरले आहेत. मात्र, या गडगडत्या बाजारातही काही स्टॉक्स 
गुंतवणूकदारांना दिलासा देत आहेत. अशाच काही मोजक्या स्टॉक्सपैकी एक म्हणजे  PSU रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL).


घसरणाऱ्या बाजारात RVNL ने पकडला ‘बुलेटचा वेग’ 

RVNL च्या शेअरने गेल्या काही दिवसांत दमदार तेजी दाखवली आहे. यावर्षी आतापर्यंत 16% घसरलेला हा स्टॉक बबुधवारी 11% पेक्षा आधी उसळला. कंपानीला रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (कर्नाटक) लिमिटेडकडून  ₹554.46 कोटींच्या ऑर्डर मिळाल्याच्या बातमीने गुतंवणूकदारांमध्ये उत्साह संचारला. 

या ऑर्डरनंतर शेअरने बुधवारी मोठी उसळू घेतली आणि गृवारीही त्यामध्ये तेजी कायम राहिली . मंदीच्या काळात अशा प्रकारची वाढ गुंतवणूकदारांसाठी 'फील गुड' ठरली आहे. 

हेही वाचा: एकदाच प्रीमियम भरा अन्...आयुष्यभर पेन्शन मिळवा! LIC ने सुरू केली नवीन Smart Pension योजना

कंपनीला मिळालेली ऑर्डर काय आहे?
RVNL ला रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (कर्नाटक) लिमिटेड (K-RIDE) कडून हा मोठा कंत्राट मिळाला आहे. यामध्ये RVNL ला बंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाच्या कॉरिडॉर-4A वर 9 नवीन स्थानके बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: iPhone 16e: 16 सिरीज मधील परवडणाऱ्या किमतीत दमदार फीचर्ससह लाँच!

या प्रकल्पात हे काम करण्यात येणार:
    •    1 एलिव्हेटेड आणि 8 ॲट-ग्रेड स्थानकांची निर्मिती
    •    सिव्हिल आणि स्ट्रक्चरल वर्क
    •    स्टील एफओबी, छत रचना, आर्किटेक्चरल फिनिशिंग
    •    इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल वर्क
    •    सविस्तर डिझाइन आणि अभियांत्रिकी काम


सध्या बाजारात घसरण सुरू असली तरी, रेल्वे क्षेत्रातील मोठ्या सरकारी ऑर्डर RVNL सारख्या कंपन्यांसाठी सकारात्मक संकेत देत आहेत. अल्पकालीन नफा मिळवू इच्छिणाऱ्या तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठीही रेल्वे स्टॉक्स हा आकर्षक पर्याय ठरू शकतो.


 


सम्बन्धित सामग्री