Saturday, February 15, 2025 01:06:54 PM

Beer Price Hike
तळीरामांच्या खिशाला लागणार झळ! बिअर 15 टक्क्यांनी महागली; आजपासून नवीन किमती लागू

बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.

तळीरामांच्या खिशाला लागणार झळ बिअर 15 टक्क्यांनी महागली आजपासून नवीन किमती लागू
Beer Price Hike
Edited Image

Beer Price Hike: मद्यप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही बिअर पीत असाल तर आता तुम्हाला बिअरच्या प्रत्येक बाटली किंवा कॅनसाठी 15 टक्के जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर सरकारने एका आदेशात म्हटले आहे की, आजपासून जुन्या एमआरपी असलेल्या बिअरच्या बाटल्या आणि कॅनची विक्री देखील नवीन दरानुसार होईल. दिलासादायक बाब म्हणजे बिअरच्या किमतीतील ही नवीन वाढ प्रत्येकासाठी लागू नाही. 

हेही वाचा - काय सांगता!! तिरुपतीचे लाडू विकून मंदिराला दरवर्षी मिळतात 'इतके' कोटी रुपये

या राज्यात वाढवण्यात आल्या किमती - 

फक्त तेलंगणामध्ये बिअरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा की, तेलंगणामध्ये बिअर खरेदी करण्यासाठी 15 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. युनायटेड ब्रुअरीजने गेल्या महिन्यात तेलंगणा बेव्हरेज कॉर्पोरेशन लिमिटेड (TGBCL) ला बिअरचा पुरवठा थांबवला होता. पुरवठा थांबवण्यामागे कंपनीने दोन कारणे दिली होती. 

या कारणांमुळे वाढल्या बिअरच्या किंमती - 

यातील पहिले कारण म्हणजे TGBCL ने आर्थिक वर्ष 2019-20 पासून कंपनीच्या बिअरच्या मूळ किमतीत सुधारणा केलेली नाही. दुसरे कारण म्हणजे कंपनीने बीअरच्या मागील पुरवठ्यासाठी TGBCL ला देय असलेले पैसे दिले नव्हते. या दोन कारणांमुळे, कंपनीला तेलंगणामध्ये बिअरचा पुरवठा थांबवावा लागला. कारण सरकारच्या वृत्तीमुळे कंपनीला तोटा होत होता.

हेही वाचा - 'ही' सरकारी योजना देते FD पेक्षा जास्त परतावा; 31 मार्चपर्यंतचं करू शकता गुंतवणूक

युनायटेड ब्रुअरीज स्वतः किंगफिशर सारख्या प्रसिद्ध ब्रँडची बिअर बनवते. एवढेच नाही तर, युनायटेड ब्रुअरीज ही भारतातील सर्वात मोठी बिअर कंपनी आहे, ज्याचा संपूर्ण बाजारपेठेत 70 टक्के वाटा आहे. ही कंपनी देशभरात वर्षभरात 12 बाटल्यांचे 6 कोटी बॉक्स विकते. तेलंगणामध्ये, राज्य सरकार स्वतः कंपन्यांकडून दारू खरेदी करते आणि सर्व दुकानांना ती पुरवते. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, तेलंगणामध्ये बिअरची किंमत प्रति बॉक्स सुमारे 300 रुपये आहे.
 


सम्बन्धित सामग्री