Sunday, April 13, 2025 08:58:01 PM

मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर!

मुंबई महापालिकेचा 25-26 वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प  आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर सादर करण्यात आला आहे. 2025 चा 74427. 41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर, मुंबई महापालिकेचा 25-26 वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प  आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर सादर करण्यात आला आहे. 2025 चा 74427. 41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा 14.9 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
 

महत्त्वाचे खर्च आणि प्रकल्प
 रस्ते आणि वाहतूक विभाग – 5,100 कोटी रुपये
दहिसर-भाईंदर कोस्टल रोड – 4,300 कोटी रुपये
 गोरेगाव-मुलुंड लिंक रोड – 1,958 कोटी रुपये
 आरोग्य विभागासाठी – 7,379 कोटी रुपये
 शिक्षण विभागासाठी – 3,955 कोटी रुपये

हेही वाचा: Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा

शिक्षण क्षेत्रात दोन नवी मिशन्स

महापालिकेच्या “मिशन व्हिजन 27” आणि “मिशन संपूर्ण” या दोन नव्या मोहिमा शिक्षणाच्या विकासासाठी राबवल्या जाणार आहेत.

झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर भरावा लागणार!

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे – झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांकडून मालमत्ता कर आकारला जाणार आहे.
> मुंबईत सुमारे अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत, त्यातील 20% झोपडपट्ट्यांमध्ये व्यावसायिक वापर केला जातो (दुकाने, हॉटेल्स, गोदामे इत्यादी).
> या निर्णयामुळे महापालिकेला सुमारे 350 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबई पर्यटनासाठी नवीन योजना

> कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटींची तरतूद
> संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जमिनीखाली वाघाचं शिल्प
>  लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प
> काळाघोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा नवा विकास

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


महापालिकेने 2012-13 पासून 2025 पर्यंत BEST उपक्रमासाठी 11,304.59 कोटी रुपये दिले. 2025-26 साठी 1,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि झोपडपट्टी पुनर्वसनावर भर देण्यात आला आहे. नव्या प्रकल्पांमुळे शहराचा विकास वेगाने होईल, तसेच नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री