Thursday, April 17, 2025 09:29:06 PM

सभांचा धडाका

शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी योही मुंबईत सभा घेत आहेत.

सभांचा धडाका 
YOGI ADITYANATH

मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी योही मुंबईत सभा घेत आहेत. 
मालेगाव, पालघर, आणि मुंबईमध्ये योगींची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी, १८ मे, २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी योगी आदित्यनाथ मुंबईत सभा घेणार आहेत. पालघरमध्ये दुपारी २:३० वाजता आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये कुर्ला पश्चिम येथे दुपारी ४.०० वाजता जाहीर सभेला सुरुवात होणार आहे. या जाहीर सभेतून आदित्यनाथ काय मुद्दे मांडतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 
मालेगावात भाजपा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सभा घेत आहेत. तर, पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत. 
मालेगावात धुळे मतदारसंघात भाजपाचे डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर रहमान यांच्यात लढत आहे. 
पालघरमध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सावरा, शिउबाठाच्या भारती कामडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या विजया म्हात्रे यांच्यात लढत आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम, काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि एमआयएमचे वारिस पठाण यांच्यात लढत आहे. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.


सम्बन्धित सामग्री