Sunday, March 23, 2025 04:32:20 PM

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय.&quotमहाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं&quot अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार

पुणे: पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय."महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय. त्यामुळे बॅनर आता पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे "महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" असा उल्लेख असलेले बॅनर. पुण्यातील टिळक रस्त्यावर हे बॅनर झळकले असून, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे बॅनर सदाशिव पेठेत राहणारे प्रकाश गायकवाड यांनी लावले असून, त्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्याच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, "दोन्ही भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे."

हेही वाचा:  मनसेचा कोणता नेता जाणार भाजपा विधान परिषदेवर?

राजकीय वर्तुळात चर्चा
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद सुरू आहे. एकेकाळी शिवसेनेचा एक भाग असलेल्या राज ठाकरे यांनी 2006 मध्ये वेगळी वाट धरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. मात्र, दोघेही महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा सातत्याने मांडत आले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात का? याबाबत राजकीय तज्ञ अनेक तर्कवितर्क लावत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात लागलेल्या या बॅनरमुळे चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाश गायकवाड यांचा संदेश
हे बॅनर लावणारे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की, "बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे."

त्यांनी पुढे असेही म्हटले की, "सध्याच्या राजकीय परिस्थितीत मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा हातमिळवणी करावी. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी जनतेच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल."

त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र, राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात. अशा परिस्थितीत पुण्यात लावलेले हे बॅनर भविष्यात काही संकेत देत आहेत का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री