Thursday, March 27, 2025 12:26:45 AM

देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराड कोण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नुकतीच महत्त्वाची माहिती समोर आली.

देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराड कोण

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली. देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. काही आठवड्यापासून वाल्मिक कराड हा फरार होता. पोलिसांनाकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र तो स्वत:चा पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. 22 दिवसांनंतर अखेर कराडने शरणागती पत्करली आहे.

हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराड पोलिसांना शरण

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर तीन आरोपी फरार होते. त्यातच वाल्मिक कराड हा एक होता. आता हत्या प्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. आरोपींचे लोकेश ट्रेस करण्यात आले. तसेच आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. त्यानंतर कराड पोलिसांना शरण जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आज वाल्मिक कराड याने सीआयडीकडे शरणागती पत्करली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कोण आहे वाल्मिक कराड ?

वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता. त्याचदरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक निर्माण झाली.  2009 मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडचा हट्ट होता. त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला. मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर कराड धनंजय मुंडेसोबत गेला. वाल्मिक कराड परळीत विद्यानगर शाखेतून नगरसेवक बनला. कराड याने परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. 15 वर्षे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कराडने धनंजय मुंडेंचा कारभार पाहिला आहे. 25 वर्षात कराडवर एकूण 14 गुन्हे दाखल झाले आहेत. कराडवर खंडणी, फसवणूक, मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. कराडवर मस्साजोगमधील पवनऊर्जा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फरार होता.


सम्बन्धित सामग्री