Wednesday, September 18, 2024 02:20:05 AM

RAKSHA BANDHAN
रक्षाबंधनाला बांधलेली राखी कधी काढावी ? कुठे ठेवावी ?

बहीण भावाच्या गोड तरी चटपट्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बांधलेली राखी नेमकी कधी काढावी आणि कुठे ठेवावी ? जाणून घेऊयात...

रक्षाबंधनाला बांधलेली राखी कधी काढावी  कुठे ठेवावी
rakshabandhan

१९ ऑगस्ट, २०२४, मुंबई : बहीण भावाच्या गोड तरी चटपट्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचं संरक्षण करण्याचं वाचन देतो तसंच त्यासोबत तिला भेटवस्तू देतो. काही जण रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी वर्षभर ठेवतात, तर काहीजण रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी ती उतरवतात. पण रक्षाबंधनाला बांधलेली राखी नेमकी कधी काढावी आणि कुठे ठेवावी ? जाणून घेऊयात... 

राखी कधी काढावी ?

रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी किंवा ज्या दिवशी आपल्या मनगटावर राखी बांधली जाईल, त्या दिवशी किमान २४ तास राखी तशीच असू द्यावी. २४ तासांनंतर म्हणजेच एक दिवस निघून गेल्यावर ती राखी काढू शकतो. अनेक ठिकाणी लोक राखी कोणत्याही शुभ दिवशी काढावी असेही मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधानानंतर आणि पितृपक्षाआधी येणाऱ्या कोणत्याही सणाला राखी काढली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाला बांधलेली राखी जन्माष्टमीला, बैल पोळ्याला किंवा गणेशेत्सवात आपण काढू शकतो. 

राखी उतरावल्यावर कुठे ठेवायची ?

अनेक वेळा लोक राखी काढून घरात कुठेही ठेवताना दिसतात, पण असे करणे चुकीचे आहे. राखी उतरवल्यानंतर वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. अनेकजण गणेशेत्सवादरम्यान राखी काढतात आणि मग बाप्पाच्या विसर्जनासोबत राखीही विसर्जित करतात. तसेच, राखी उतरवल्यानंतर ती झाडाला सुद्धा बांधू शकतो. तसेच महाराष्ट्रात बैलपोळ्याला राखी काढून ती बैलांच्या शिंगाना बांधायचीही परंपरा आहे.

सध्या सोन्या - चांदीच्या राख्यांचीही चलती आहे. त्यामुळे अनेक बहिणी आपल्या भावांना सोनं किंवा चांदीपासून तयार केलेली राखी बांधतात. अशा परिस्थितीत सोन्या - चांदीची राखी वर्षभर घालता येऊ शकते. एखाद वेळेस राखी काढायची असेल तर ती सांभाळून ठेवून पुढच्या वर्षी पुन्हा वापरताही येऊ शकते. 
 


सम्बन्धित सामग्री