नवाब मलिक आता महायुतीसोबत जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतून नवाब मलिक हे महायुतीमध्ये चंचूप्रवेश होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरु आहे. सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी ही जनसन्मान यात्रा नवाब मलिक यांच्या मतदार संघात पोहोचली. सोमवारी ही जनसन्मान यात्रा मुंबईतील वांद्रे पूर्व येथून अणुशक्तीनगरपर्यंत काढण्यात आली.यावेळी एकाच फलकावर नवाब मलिक आणि अजित पवार यांचे फोटोही झळकले आहेत.
फडणवीस - मालिकांमध्ये नेमकं काय घडलं ?
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला एका पार्टीत पकडले गेले.
आर्यनला ताब्यात घेणारा अधिकारी समीर वानखेडे त्यामुळे चर्चेत आला.
समीर वानखेडेच्याविरोधात नवाब मलिक यांनी आघाडी उघडली.
वाद विकोपाला गेला असताना नवाब फडणवीसांवर घसरले.
वादग्रस्त व्यक्तिमत्व फडणवीस दाम्पत्याच्या संपर्कात असल्याचा दावा नवाब यांनी केला.
मलिकांनी फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी वादग्रस्त व्यक्ती आल्याचा दावा केला.
फडणवीस यांनी मलिकांचे आरोप फेटाळले आणि नवे आरोप केले.
मलिक यांनी बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
मलिक यांना कालांतराने अटक झाली आणि त्यांना दीर्घकाळ तुरुंगात रहावे लागले.
अजित पवार महायुतीत आल्यावर मालिकांच्या समर्थनाचा मुद्दा उपस्थित झाला.
मलिक खुलेआम अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने भाजपा नाराज झाली.
फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना दूर ठेवण्याची सूचना अजित पवारांना केली.
फडणवीस यांची सूचना असूनही अजित पवार मलिक यांना दूर ठेवण्यास तयार नाहीत.
नवाब मलिकांना सोबत घेण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. मात्र भाजपाचा विरोध आणि फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवत सोमवारी अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेतल्याचं चित्र दिसत आहे. तसेच, फडणवीस आणि मलिक यांच्यातला वाद टाळण्यासाठी नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांची मुलगी सना मलिक हिला उमेदवारी देण्याची अजित पवार क्लुप्ती लढवत आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.