वर्धा पोलिसांची कारवाई – हॉटेलमध्ये गोवंश मांस विक्री प्रकरणात मोठा खुलासा
प्रमोद पाणबुडे वर्धा प्रतिनिधी - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्धा शहरातील एका हॉटेलमध्ये थेट गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वर्धा शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता, संबंधित हॉटेलमध्ये गोमांस शिजवून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
गांधींच्या विचारांचा अपमान?
महात्मा गांधी हे कट्टर शाकाहारी होते. त्यांनी गायीचे दूध न पिण्याची शपथ घेतली होती आणि केवळ बकरीचे दूध स्वीकारले होते. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी आईला दिलेल्या वचनानुसार मास व मद्य सेवन केले नव्हते. त्यांच्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातच असे प्रकार घडत असल्याने अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पोलिसांची गुप्त माहिती आणि कारवाई
वर्धा शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी खुलेआम तसेच छुप्या पद्धतीने गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वर्धा शहरातील एका हॉटेलवर छापा टाकला. ठाणेदार पोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने हॉटेलचे प्रत्येक कोपरा तपासले. यावेळी संशयास्पद मांस आढळून आले.
मांसाचा अहवाल आणि पोलिसी कारवाई
संबंधित मांस नेमके कुठल्या जनावराचे आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञांची मदत घेतली. तज्ज्ञांनी पाहणी करून हे गोवंशाचे मांस असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर हॉटेल मालकाला ताब्यात घेतले गेले असून, त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे
हे प्रकरण पुढे कोणते वळण घेणार, अजून किती आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यात अशा प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
👉👉 हे देखील वाचा : वंदे भारतच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेसचा कराल स्वस्त प्रवास लवकरचं