बीड : वाल्मिक कराड याच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यासाठी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर कराड समर्थकांनी आंदोलन केले. या आंदोलनात वाल्मिक कराड याच्या आईसह अनेक लोक सहभागी झाले होते. परंतु रात्री आंदोलन स्थगित करण्यात आले. आज सकाळी दहा वाजता याच समर्थकांची बैठक होणार आहे, ज्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
गेल्या रात्री आंदोलनादरम्यान परळी शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
👉👉 हे देखील वाचा : सुरेश धस राजीनामा देणार. पण...
दरम्यान, वाल्मिक कराड याला आज न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दुसरीकडे, मोका अंतर्गत कारवाईसाठी एसआयटी (Special Investigation Team) आज कराडचा ताबा मागणार आहे. यासाठी न्यायालयात युक्तिवाद होणार असून, न्यायालय काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाल्मिक कराड याच्यावर दाखल केलेले गुन्हे राजकीय दबावाखाली असल्याचे त्याच्या कुटुंबाचे आणि समर्थकांचे म्हणणे आहे.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.