१७ सप्टेंबर, २०२४, पुणे : पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन झालं त्यानंतर गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले. यानंतर तिसरा मनाचा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

अतिशय उत्साहपूर्ण तरीही भावुक वातावरणात पुणेकरांनी गुरुजी तालीम गणपतीला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.