Thursday, September 19, 2024 10:49:36 PM

KESARI VADA GANAPATI VISARJAN
पुण्याच्या पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.

पुण्याच्या पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 
kesarivada

१७ सप्टेंबर, २०२४, पुणे : पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन झालं त्यानंतर गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन झाले. यानंतर तिसरा मनाचा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे आणि पाचवा मनाचा गणपती केसरी वाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 
दरवर्षीप्रमाणे गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. 


अतिशय उत्साहपूर्ण तरीही भावुक वातावरणात पुणेकरांनी केसरी वाडा गणपतीला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 
 


सम्बन्धित सामग्री