'हिमालयात संत महात्मा खूप आहेत, त्यांचं काय करायचं? मला सांगा त्यांचा आपल्याला काही उपयोग आहे का?' असे जाहिर विधान करून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक नवा वाद ओढवून घेतला आहे. भुजबळांच्या विधानावर भाजपाने तीव्र आक्षेप घेत आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवले आहे, असे म्हणत भुजबळ यांना डिवचलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वार नाराज असलेले छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या, मधल्या काळात राष्ट्रवादीकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्नही झाले. मात्र भुजबळ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. भाजपात जाण्याबाबत त्यांची चाचपणी सुरू होती,मात्र, आता त्यांनी साधूसंतांवर बोलून भाजपाची नाराजी ओढवून घेतली आहे.
हेही वाचा: Nashik: नाशकात शिवसेनेचा वाद संपेना..
भुजबळांच्या भाजप प्रवेशावर चर्चा
गेल्या काही काळापासून छगन भुजबळ भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले असले तरी भुजबळ आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
साधू-संतांवर वक्तव्यामुळे भाजपची नाराजी
भाजपाचा प्रामुख्याने आध्यात्मिक विचारसरणीवर भर असल्याने भुजबळांच्या विधानाने पक्षात नाराजी पसरली आहे. भाजपाचे नेते साधू-संतांचा सन्मान महत्त्वाचा मानतात. त्यामुळे भुजबळ यांच्यावर टीका होत आहे.
हेही वाचा: धक्कादायक ! बारावी परीक्षा केंद्रावर अव्यवस्था; पालकांचा संताप
राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
भुजबळांच्या विधानामुळे त्यांचा भाजप प्रवेश आता अधिक कठीण झाला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही या प्रकरणावरून अस्वस्थ असून, पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट देईल, असे दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आगामी राजकीय घडामोडीवर सगळ्यांचे लक्ष आहे.