Monday, April 07, 2025 11:02:48 AM

Manoj Jarange: 'बीड मधील तपास अधिकारी बदला'

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात नेमलेल्या एसआयटीमधील बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी हटवावेत. व त्या बदल्यात अन्य जिल्ह्यातील अधिकारी नेमावेत, अशी मागणी

manoj jarange बीड मधील तपास अधिकारी बदला

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात नेमलेल्या एसआयटीमधील बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी हटवावेत. व त्या बदल्यात अन्य जिल्ह्यातील अधिकारी नेमावेत, अशी मागणी मनोद जरांगेसह अन्य वक्त्यांनी केली.  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबतच्या गंभीर घटनांची जाणीव सरकारला करून देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होते.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

देशमुख यांची हत्या खंडणीच्या दीड कोटी रूपयांसाठी झाली आहे,असा  थेट आरोप वाल्मिक कराडवर त्यांनी केला. वाल्मिकला तातडीने मकोका लावावा आणि अजित पवारांनी मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी धस यांनी केली. देशमुख व परभणी येथील सूर्यवंशी यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पाठीशी न घालता सरकारने मास्टरमाइंडचा शोध घेऊन सर्वांवर कठोर कारवाई करावी.

अन्यथा हे आंदोलन यापुढेही तीव्र केलं जाईल असा इशारा सुरेश धस यांनी केला.  या प्रकरणीत अन्य आरोपींना मकोका लावला असला तरी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा अद्याप लावलेला नाही. यंत्रणांनी त्याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी अन्य नेत्यांनी केली. देशमुख हत्याप्रकरणी अनेक जिल्ह्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन होत आहे. हत्येला महिना पूर्ण झालाय मात्र, यंत्रणांना हत्येच्या सुत्रधारापर्यंत पाहोचण्यात यश आलेलं नाही. 


सम्बन्धित सामग्री