नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनांची मोठ्या संख्येने ये-जा होत असते. या महामार्गावर अपघाताच्या घटना पाहायला मिळतात. यातच आता नाशिक मुंबई महामार्गावर भर रस्त्यात टँकर पलटी झाला. टँकर रस्त्यात आडवा झाल्याने नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासांपासून खोळंबली. गोंदे ते पाडळी फाटा अशी मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक वळविली. रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. टँकर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.