रायगड : रायगडमधील हरिहरेश्वर हा समुद्रकिनारा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षभर भाविक या ठिकाणी येतात, मात्र सरत्या वर्षाला निरोप देत असताना देवदर्शनासाठीदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक हरिहरेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत पर्यटक भाविकांनी हरिहरेश्वर येथे गर्दी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
हरिहरेश्वर समुद्रकिनारा या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसात नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. या निमित्ताने पर्यटक समुद्राचा आनंद घेण्यासाठी हरिहरेश्वर येथे येत आहेत. हरिहरेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे तेथील नवीन स्थानिकांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिकांच्या पोटापाण्याचा देखील प्रश्न मिटत आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडे विरोधातील आव्हाडांची चॅट व्हायरल; नेमकं प्रकरण काय?
हरि म्हणजे विष्णू आणि हरेश्वर म्हणजे शंकर सोबत पार्वती आणि काळभैरव असे देव या ठिकाणी एकात्र असल्याने या मंदीराच महात्म अधिक आहे.