नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी बाजारात सध्या टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टोमॅटोला हवा तसा भाव मिळत नसल्याने पाच रुपये किलोने टोमॅटो विक्रीला सुरुवात आहे. तर दहा ते पंधरा रुपयांनी टोमॅटोचे भाव घसरले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. दरम्यान पाच रुपये, दहा रुपये आणि पंधरा रुपये किलोने जसा माल असेल त्या पद्धतीने विक्री होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
टोमॅटोचे भाव कमी झाले असल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्त टोमॅटो एपीएमसी बाजारामध्ये दाखल होत आहेत. त्यामध्ये काही खराब निघत असल्याचेही व्यापाऱ्यानी सांगितले.
हेही वाचा : बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
टॉमॅटोचे दर घसरल्याने गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एखाद्या भाजीचा दर वाढला. तरी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. आता टोमॅटो स्वस्त झाल्याने ग्राहक सुखावले आहेत.