Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याची लोकसंख्या मोठी असून सामान्य लोकांनी न्यायाच्या भूमिकेतून राहिलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीड जिल्ह्यातील अन्य नेत्यांचे मागील काही दिवसांचे वेगवेगळे प्रकरणे बाहेर काढत असल्याचा दावा, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे एकामागून एक कांड दिवसेंदिवस उघड होत असून यामुळे बीड पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
धनंजय मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेला आडनाव बदलण्याची वेळ आली -
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या कपड्यांना लावल्या जाणाऱ्या नेमप्लेटवर फक्त नाव लावायचे आडनाव लावायचे नाही, अशी सूचना बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे. यावर बोलताना जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेला आडनाव बदलण्याची वेळ आली असून जिल्ह्यामध्ये जातीयवाद यांच्यामुळेच वाढला असल्यास म्हटलं आहे. तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम हे देखील धनंजय मुंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये कृष्णा आंधळे फिरत असल्याचा दावा ठरला..; नाशिक पोलिसांचा खुलासा
भाजपा आमदार सुरेश धस यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे प्रकरण मोठ्या ताकतीने नागपूर अधिवेशनात गाजवले होते. त्याच सुरेश धस यांचे निकटवर्तीय असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याने शिरूर कासार तालुक्यामध्ये दहशत निर्माण करत वन्य प्राण्यांचे तस्करी केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढणार का प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात सुरेश धस यांच्या विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता.
हेही वाचा - दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडीओ समोर; कोण आहे ओमकार सातपुते?
याशिवाय, बीड जिल्ह्यातील बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील तहसीलदारांना फोन करून अर्वाचे भाषेत दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तथापि, माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून दमदाटी व मारहाणीचे व्हिडिओ समोर आले होते.
धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकरला अटक -
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे देखील मारहाण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर बीड पोलिसांनी खिंडकर विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दादा खिंडकर हे गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे निकटवर्तीय मानले जातात.