Monday, March 31, 2025 03:40:30 PM

Eknath Shinde on Nagpur Violence: 'हा एक सुनियोजित कट आहे'; नागपूर हिंसाचारावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

eknath shinde on nagpur violence हा एक सुनियोजित कट आहे नागपूर हिंसाचारावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde on Nagpur Violence
Edited Image

Eknath Shinde on Nagpur Violence: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे राज्यातील तणाव वाढला आहे. पोलिसांनी शहरातील अनेक भागात कर्फ्यू जाहीर केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे विधान समोर आले आहे. नागपूरमधील हिंसाचार हा एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पोलिसांवर, समाजावर, सामान्य लोकांवर हल्ला करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. सर्वांनी महाराष्ट्रात शांतता राखली पाहिजे. मी जनतेला आवाहन करतो की, पोलिस आपले काम करत आहेत, पोलिस आरोपींवर कठोर कारवाई करतील.'

हिंसाचारा घडवून आणणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल  

एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नागपूरमधील घटना दुर्दैवी आहे. हा पूर्वनियोजित कट होता का याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेत 4 डीसीपी दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की, अनेक लोक बाहेरून आले होते. पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. पोलिसांवरही हल्ला झाला हे दुर्दैवी आहे. या घटनेत कठोर कारवाई केली जाईल. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. 

हेही वाचा - मोठी बातमी! औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा

लोकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले - 

नागपूर हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, जिथे सुमारे 2-4 हजार लोक एकत्र आले आणि त्यांनी लोकांच्या घरांना लक्ष्य केले, दगडफेक केली आणि वाहने जाळली. लोक थोडक्यात बचावले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि त्यांच्यावरही हल्ला झाला. पोलीस शांतता राखण्याचे काम करत असून हिंचारास करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.

हेही वाचा - Nagpur Violence Devendra Fadanvis: फडणवीसांनी सांगितला नागपूर हिंसाचाराचा थरारक घटनाक्रम

औरंगजेबाचे समर्थन कोणीही सहन करणार नाही - एकनाथ शिंदे

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात औरंगजेबाला पाठिंबा देणे कोणीही सहन करणार नाही. औरंगजेब हा देशाचा शत्रू, आक्रमक आणि अत्याचारी होता. औरंगजेब क्रूर होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. छत्रपती संभाजींबद्दल जनतेच्या भावना गंभीर आहेत. लोकांमध्ये देशद्रोही औरंगजेबाबद्दल संताप आहे. नागपुरात जे काही घडले आहे तो, एक सुनियोजित कट असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री