Monday, September 09, 2024 08:19:08 PM

hweavy rain in nashik
नाशकात मुसळधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे.

नाशकात मुसळधार नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
nashik rain

४ ऑगस्ट, २०२४, नाशिक : नाशिक शहर आणि धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातुन पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे. ६ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. गंगापूर सह दारणा, पालखेड, कडवा, पुनद नांदूरमाध्यमेश्वर धरणांतून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  नाशिक जिल्ह्याला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी कादवा, दारणा, या नद्यांसह छोट्या-मोठ्या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. 


 


सम्बन्धित सामग्री