१७ ऑगस्ट, २०२४, रत्नागिरी : चिपळूणच्या सावर्डेमधील कातभट्टीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटलाय. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने टाळेबंदीची नोटीस बजावूनही कारखाना सुरुच असल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून चिपळूण तालुक्यातील सावर्डे गाव आणि पंचक्रोशीतील सात गावातील गावकरी हा कारखाना बंद होण्यासाठी साखळी उपोषणास बसले आहेत. जर का कारखाना बंद झाली नाही तर येत्या २१ तारखेला रास्तारोकोचा निर्वाणीचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.