महाराष्ट्राच्या कुलदैवत असणाऱ्या खंडोबा महाराजांचे पावन स्थळ जेजुरी प्रभू खंडेरायाच्या भक्तांसाठी एक नवे पर्व सुरू झाले आहे. मंदिरात प्रवेशासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले असून, भारतीय पारंपरिक वेशभूषा आवश्यक असल्याचा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान यांनी घेतला आहे.
प्रत्येक वर्षी लाखो भाविक जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातून येणाऱ्या भक्तांची अपार श्रद्धा पाहता मंदिर समितीने भारतीय वेशभूषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फाटकी जीन्स, बरमुडा, शॉर्ट्स, स्कर्ट अशा पाश्चात्य पोशाखांवर निर्बंध असतील. पुरुष आणि महिलांसाठी समान नियम लागू असतील व गुडघ्याच्या वर असणारे किंवा अतीच कमी कपडे घालून येणाऱ्यांना मंदिर प्रवेश दिला जाणार नाही.
मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थळ नसून, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळेच भारतीय पोशाख परिधान करण्याचा नियम आणण्याचा उद्देश भाविकांची आस्थेसह शिस्त आणि आदर राखणे हा आहे. संस्थानाच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आले आहे की कोणतेही पारंपरिक भारतीय पोशाख मान्य असतील, त्यामुळे धोतर, साडी, सलवार-कुर्ता, पंजाबी ड्रेस असे कपडे परिधान करणे अपेक्षित आहे.
तृप्ती देसाईंची आक्रमक प्रतिक्रिया:
जेजुरीच्या बदलत्या निर्णयामुळे तृप्ती देसाई आक्रमक झाल्या त्यांनी समाज माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेजुरीचा खंडेराया हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जातात. या देवस्थानाच्या दर्शनाला जाताना भाविकांनी ड्रेस कोडचे पालन करायचे असे निर्णय ट्रष्टी कडून घेण्यात आले. ज्यात पाश्चात्य कपड्याने विरोध केल्याचे समजलं जातंय.त्याचबरोबर त्या म्हणाल्या खरं तर हा भाविकांचा निर्णय आहे. कुणीही तोकडे कपडे घालून मंदिरात येत नाही. परंतु, 'जेव्हा पासून हिंदुत्ववादाचं सरकार आलंय तेव्हा पासून प्रत्येक मंदिरात जाऊन ड्रेस कोड चे फलक लावायचे आणि संविधानात दिलेल्या अभिव्यक्ती स्वंत्रतत्र्यावर गदा आण्याचे जे काम आहे ते सरास सुरु आहे. भाविकांना कळतं कोणते कपडे कुठे घालावे त्यांच्यावर ड्रेस कोडच्या नावाने गोष्टी लादू नका. '
त्यामुळे जेजुरीच्या मंदिराच्या ड्रेस कोडचा मुद्दा अजून किती लांबणार आणि त्यावर नेमके काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.