Friday, April 18, 2025 12:04:24 PM

राज्यात चौथ्याटप्प्यातील मतदान सुरु

सोमवारी १३ मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात आणि देशभरातील ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

राज्यात चौथ्याटप्प्यातील मतदान सुरु 
voting

मुंबई, १३ मे २०२४, प्रतिनिधी : सोमवारी १३ मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडत आहेत. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात आणि देशभरातील ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. 
महाराष्ट्रातील नंदुरबार,  जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. देशभरात आंध्र प्रदेशातील २५ , तेलंगाणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील ११,  मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४ आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडत आहे. 

महाराष्ट्रात लोकसभेच्या रिंगणात कोण?

नंदुरबार – हिना गावित, भाजपा विरुद्ध गोवाल पाडवी, काँग्रेस विरुद्ध हनुमंत सूर्यवंशी, वंचित
जळगाव – स्मिता वाघ, भाजपा विरुद्ध करण पवार, शिउबाठा विरुद्ध प्रफुल लोढा, वंचित
रावेर – रक्षा खडसे, भाजपा विरुद्ध श्रीराम पाटील, राशप विरुद्ध संजय ब्राह्मणे, वंचित
जालना – रावसाहेब दानवे पाटील, भाजपा विरुद्ध कल्याण काळे, काँग्रेस विरुद्ध प्रभाकर बकले, वंचित
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) – संदीपान भूमरे, शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे, शिउबाठा विरुद्ध, अफसर खान, वंचित विरुद्ध इम्तियाज जलील, एमआयएम
मावळ – श्रीरंग बारणे, शिवसेना, संजोग वाघेरे पाटील, शिउबाठा
पुणे – मुरलीधर मोहोळ, भाजपा विरुद्ध रवींद्र धंगेकर, काँग्रेस विरुद्ध वसंत मोरे, वंचित
शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
अहमदनगर – सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
शिर्डी – सदाशिव लोखंडे, शिवसेना विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे, शिउबाठा विरुद्ध अशोक आल्हाट, ओबीसी बहुजन विरुद्ध उत्कर्षा रुपवते, वंचित
बीड – पंकजा मुंडे, बीड, भाजपा विरुद्ध बजरंग सोनावणे, राशप
 


सम्बन्धित सामग्री