Friday, April 18, 2025 12:04:24 PM

सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणूक होणार

महाराष्ट्रात सोमवारी २० मे रोजी पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभेची निवडणूक होणार आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.


सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणूक होणार
election

मुंबई,१९ मे २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात सोमवारी २० मे रोजी पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभेची निवडणूक होणार आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासनदेखील मतदानासाठी सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणाऱ्या साहित्य वाटपाला सुरूवात झाली आहे. 
  
लोकसभा निवडणूक, पाचवा टप्पा - महाराष्ट्र, मतदान २० मे २०२४

१ धुळे - सुभाष भामरे, भाजपा विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस विरुद्ध अब्दुर रहमान, वंचित
२ दिंडोरी - भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप विरुद्ध गुलाब बर्डे, वंचित
३ नाशिक - हेमंत गोडसे, शिवसेना विरुद्ध राजाभाऊ वाजे, शिउबाठा
४ पालघर - डॉ. हेमंत सावरा, भाजपा विरुद्ध भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित
५ भिवंडी - कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप विरुद्ध निलेश सांबरे, वंचित
६ कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे, शिउबाठा
७ ठाणे - नरेश म्हस्के, शिवसेना विरुद्ध राजन विचारे, शिउबाठा
८ उत्तर मुंबई - पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित
९ उत्तर मध्य मुंबई - अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस विरुद्ध वारिस पठाण, एमआयएम
१० दक्षिण मुंबई - यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
११ दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
१२ वायव्य मुंबई - रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित
१३ ईशान्य मुंबई - मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा


 


सम्बन्धित सामग्री