Sunday, September 08, 2024 08:36:40 AM

The effigy of removing the sack of Afjulya is read
अफ़जुल्याचा कोथळा काढतानाचा पुतळा तयार

प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतानाच पुतळा उभारावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शिवभक्त करत होते. अखेर आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार झालेला आहे.

अफ़जुल्याचा कोथळा काढतानाचा पुतळा तयार 
afzal khan vadh

२४  जुलै,२०२३ मुंबई : प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतानाच पुतळा उभारावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शिवभक्त करत होते. ही मागणी शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केली होती. अखेर आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार झालेला आहे.  

प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरी नजीकच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेत अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा भव्य पुतळा राज्य सरकारकडून उभारला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला अफझलखान वधाचा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी स्थापित करण्यात येणार आहे. हा पुतळा १८ फूट उंच आहे. 
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, 'मी पर्यटन मंत्री असताना प्रतापगडावर गेलो होतो, त्यावेळी तेथील इतिहास लोकांना कसा लक्षात राहील, याचा विचार करत होतो, यावर चर्चा केल्यानंतर अफझल खान वधाचा पुतळा बनवण्याचं ठरलं.' यानंतर, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मधील तज्ज्ञांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला'. 'हा पुतळा म्हणजे एक शिल्प नव्हे तर महाराजांच्या चेहऱ्यावरील भाव या पुतळ्यात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे'. '१५ फूट उंच हा मूर्ती असेल, ७ ते ८ टन वजन मूर्तीचे असेल'. 'महाराष्ट्रच नव्हे तर जगातील सर्वात जास्त लोक या मूर्तीच्या  दर्शनासाठी लोक प्रतापगडावर येतील', असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले. 
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुतळा स्थापित करण्याची घोषणा केली होती. हा पुतळा आता तयार झाला आहे.  येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन सुरु आहे. 


सम्बन्धित सामग्री