मुंबई : इस्थर अन्हुया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी चंद्रभान सानप याच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. मुंबईमध्ये 2014 साली इस्थरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभान सानपच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयाला चंद्रभानने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत चंद्रभानची फाशीची शिक्षा रद्द केली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
इस्थर अन्हुया नावाच्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गुन्ह्यात चंद्रभान सानप याला मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सानप याने फाशीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाला त्याने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इस्थर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तपासात काही त्रुटी आढळल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
हेही वाचा : नाव न घेता दरेकरांचा गोगावलेंना टोला
काय आहे प्रकरण?
मुंबईत 2014 साली ईस्थर अनुह्या या 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ईस्थर ही गोरेगावातील ‘टीसीएस’ कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर होती. 5 जानेवारी 2014 रोजी अंधेरीतील आपल्या घरी जाण्यासाठी इस्थर ही चंद्रभान सानपच्या रिक्षात बसली. सानपने तिला घरी सोडण्याएवजी निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता ईस्थरचा खून करून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील झुडपात तिचा मृतदेह फेकून दिला. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हा मृतदेह 10 दिवसांनी पोलिसांना सापडला. चंद्रभान सानप या रिक्षाचालकाला या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. 2015 मध्ये या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभान सानपच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आणि आज सुप्रिम कोर्टाने चंद्रभान सानपची निर्दोष मुक्तता केली.