Wednesday, December 11, 2024 03:00:58 PM

Supply of counterfeit drugs in Beed
बीडमध्ये बनावट औषधांचा पुरवठा विशाल इंटरप्रायजेसचा काळाबाजार उघडकीस

बीडमध्ये बनावट औषधांचा पुरवठा विशाल इंटरप्रायजेसचा काळाबाजार उघडकीस

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासात विशाल इंटरप्रायजेस कंपनीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात ठाणे आणि सूरत येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुरेश पाटील, मिहीर त्रिवेदी, द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांचा समावेश आहे. बनावट औषधांच्या पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशाल इंटरप्रायजेसकडून रुग्णालयाला पुरविण्यात आलेली औषधे कमी दर्जाची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या औषधांचा वापर झाल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे बीडमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

अन्न आणि औषध प्रशासनाने या बनावट औषधांचा स्रोत शोधून काढण्यासाठी तपासाला गती दिली आहे. या घटनेने औषध वितरण व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि गैरप्रकार समोर आणले आहेत.बनावट औषधांच्या प्रकरणामुळे रुग्णालये आणि औषध वितरकांवर विश्वास ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांच्या भावनांनाही तडा गेला आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होऊन भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo