Sunday, September 08, 2024 08:58:40 AM

students protest to get teacher
'शिक्षक मिळाल्याशिवाय जाणार नाही'

आसलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जळगाव जामोद पंचायत समिती आवारात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे.

शिक्षक मिळाल्याशिवाय जाणार नाही 
student protest

१९ जुलै, २०२४ बुलढाणा : आसलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जळगाव जामोद पंचायत समिती आवारात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. 
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिल्हा परिषद शाळेची पार दुरावस्था झाली आहे. आसलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने शुक्रवारी १९ जुलै रोजी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केली जात आहे. शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी आसलगाव ते जळगाव जामोदपर्यंत पायी प्रवास करत पंचायत समितीचे कार्यालय गाठले आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. 'जोपर्यंत आम्हाला शिकवायला शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत घरी परतणार नाही', अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ माजला आहे.


सम्बन्धित सामग्री