नाशिक: कायम विविध कारणांनी चर्चेत येणार नाशिकच जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलाय ह्या मागचं कारण म्हणजे प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले मात्र पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आलय.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेचे सिजर करून प्रसुती झाली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. या दरम्यानच उच्चशिक्षित असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचं सांगितलं त्यानंतर डिचार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेलेला असताना तुम्ही मागून या तुमचे टाके दुखतील मी तुमच्या बाळाला घेऊन जाते असे सांगून रुग्णालयातून महिला बाळाला घेऊन पसार झाली महिला रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळ आणि महिला दोघेही गायब असल्याचे समजले त्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरी गेल्याची तक्रार केली.
बाळ चोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मार्गावर होते. जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि महिलेच्या मागावर निघाले तीच महिला असल्याचा पोलिसांना खात्री झाली.
सपना मराठे ही उच्चशिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील असल्याचे समजले तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केली हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीगत बघून पोलीस देखील काही काळ चक्रावले. बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि बाळ चोरले असल्याचे समोर आलेय.