Thursday, June 27, 2024 07:59:50 PM

Sonia Duhan
शरद पवारांच्या विश्वासू सुप्रिया सुळेंवर नाराज

शरद पवारांच्या विश्वासू आणि राशपच्या युवा नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयीची नाराजी जाहीर करत पक्ष सोडला.

शरद पवारांच्या विश्वासू सुप्रिया सुळेंवर नाराज

पुणे : शरद पवारांच्या विश्वासू आणि राशपच्या युवा नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयीची नाराजी जाहीर करत पक्ष सोडला. सोनिया दुहान लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राशपमध्ये सर्व काही सुरळीत नाही. सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत सोनिया दुहान राशपमधून बाहेर पडल्या. हा शरद पवार यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच एक धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री