बारामती : तुम्हाला सर्वांना दादाच हवेत वहिनी का नको हो वहिनी असत्या तर काय फरक पडला असता असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेला मिळालेल्या पराभवाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुनेत्रा पवार ह्या आज बारामती दौऱ्यावर होत्या त्या पाहुणेवाडी येथील गावाभेट दौऱ्यावेळी असताना उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर लोकसभेच्या पराभवाची नाराजी व्यक्त केलीय. लोकसभेच्या अनुषंगाने मी सर्व लहान मोठ्या खेडेगावांमध्ये दौरा केला, अगदी भोर तालुक्यातील आणि मुळशी तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुद्धा दौरा केला तेथील नागरिक सांगत होती की हे जे काही केलं आहे (त्यांच्या गावातील विकास कामांबाबत) ते दादांमुळे झाला आहे. त्यांचा निधी बघितला तर अगदी पाच दहा लाखांमध्ये होता आणि आपल्या बारामती तालुक्यातील प्रत्येक गावांचा निधी हा कोटीमध्ये आहे. तरी तुम्ही यावेळी दुर्लक्ष केलं जे काय केलं ते तुम्हालाच माहिती दादांनी केलेला विकास तुम्ही विसरले असे म्हणत बारामती लोकसभेला झालेल्या पराभव सल काढत सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली.