मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील सध्या चर्चेत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. शहाजीबापूंच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले आहे. खासदार संजय राऊतांची खेळी चुकली. उद्धव ठाकरेंनी फोन बंद ठेवल्याने प्रश्न निर्माण झाले असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. संजय राऊतांची खेळी चुकली भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायला तयार झाली होती. उद्धवजींनी फोन बंद ठेवल्यामुळे देवेंद्र फडणवीस शाहांशी संपर्क न झाल्याने पुढील प्रश्न निर्माण झाला असे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
राजकारणात जूनियर आणि सीनियर असा भेद करणं गैर आहे. कार्यक्षमता, कुशलता, कारभार हाताळण्याची हातोटी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 2019 मध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्युनिअर नव्हते. त्यांना कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री पदाचा दहा वर्षांचा अनुभव होता. दोन अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं. त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद हाताळलं हे दोन अडीच वर्षापूर्वी हाताळू शकले नसते का? असा सवालही पाटील यांनी केला.
हेही वाचा : परळीत मुंडे समर्थकांचा सुरेश धसांना विरोध; दाखवले काळे झेंडे
एकनाथ शिंदे ज्युनिअर असल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं नेतृत्व नाकारलं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांची खेळी चुकली भाजपा शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यायला तयार झाली होती. उद्धवजींनी फोन बंद ठेवल्यामुळे देवेंद्र फडणवीस शहांशी संपर्क न झाल्याने पुढील प्रश्न निर्माण झाला असे वक्तव्य शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.