Friday, April 11, 2025 10:57:09 PM

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

'बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी शिंदेंनी घडवली' ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक

महाराष्ट्र: दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस होता. याच पार्शवभूमीवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यातच जेष्ठ आणि सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशीच शिवसेना एकनाथ शिंदेंनी एकट्याने पुन्हा घडवली अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतूक केलंय. 

हेही वाचा: Vaibhav Naik : पत्नीसह आज नाईकांची एसीबीकडे चौकशी

काय म्हणाल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले? 

जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशीच शिवसेना एकनाथ शिंदेंनी एकट्याने पुन्हा घडवली अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतूक केलंय. शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा देताना आशा भोसले यांनी शिंदेंनी शिवसेना कशी घडवली ते देखील सांगितलं. ज्या हिंमतीने तुम्ही लोकांच्या बोलण्याला आणि परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात ही फार अभिमानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या

दरम्यान आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंनी शिवसेना घडवली या त्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे. मध्यस्थांमार्फत रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंपर्यंत आपली नाराजी पोहचवल्याचीही सूत्रांची माहिती आहे. 


 


सम्बन्धित सामग्री