Sunday, March 16, 2025 11:16:38 AM

Satish Bhosale Police Custody: मोठी बातमी! सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी

आज सकाळी सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करून शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सतीश भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

satish bhosale police custody मोठी बातमी सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी
Satish Bhosale
Edited Image

Satish Bhosale Police Custody: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गुरुवारी प्रयागराज येथे त्याला अटक करण्यात आली होती. तेथून त्याला काल रात्री शिरूर कासार येथील पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. आज सकाळी सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करून शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. नंतर सुमारे दोन तास न्यायालयासमोर दोन्ही वकिलांनी बाजू मांडल्या. त्यानंतर न्यायालयाने सतीश भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा - होळीच्या दिवशीच खोक्याचं घर पेटवलं, बीडमध्ये खळबळ

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार परिसरात वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणे, चोऱ्या करणे तसेच वसुली करणे यासाठी अनेकांना मारहाण करणारा गुंड अशी सतीश भोसले यांची ओळख आहे. शिरूर कासार परिसरामध्ये हरिण पकडण्याचे जाळे लावले असताना तेथील ढाकणे कुटुंबीयांनी खोक्याला विरोध केल्याने ढाकणे कुटुंबीयांचे वाद झाले. त्यामुळे सतीश भोसलेने ढाकणे यांचे सात दात पाडले व त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर केला. त्यामुळे खोक्या भोसलेचे सर्वच गुंडगिरीचे प्रताप समोर आले. या संपूर्ण प्रकरणामुळे खोक्या भोसले मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे सर्वच कारणामे उघड झाले आहेत.

हेही वाचा -  खोक्या भाईला महाराष्ट्रात आणलं, थोड्याच वेळात बीडला आणणार

सतीश भोसलेच्या घरात आढळले प्राण्यांचे मांस - 

सतीश भोसले हा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. सतीश भोसले याने आपल्या सोशल मीडियावर लाखो रुपयांच्या नोटांचे बंडल फेकतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते. हे पैसे नेमके कोणाचे असा प्रश्न विरोधकांनी केला होता. त्यातच हरणांचे तस्करी करणे यामध्ये तो पटाईत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून समोर आले. सतीश भोसलेच्या राहत्या घरी जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड मारली, तेव्हा त्याच्या घरात चार किलो इतके वाळलेले मांस सापडले होते. खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागाकडून बुलडोजर फिरवण्यात आला आहे. तसेच त्याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री