महाराष्ट्र: महाराष्ट्रात राजकीय वातावरण नेहमीच तापलेलं असत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अनेक राजकीय नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. अशातच आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका होती. त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केलीय. काय म्हणाले संदीप देशपांडे पाहुयात:
हेही वाचा: मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार
काय म्हणाले संदीप देशपांडे?
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली. राज ठाकरेंच्या जीवावर आम्हाला मतं मिळाली आहेत. भाजपचा पदर पकडला म्हणून मतं मिळाली नाहीत. अजित पवारांनी स्वता:च्या जीवावर उभं राहावं मग वल्गना कराव्यात असा बोचरा वार संदीप देशपांडे यांनी केला. अजित पवार यांची पत्नी आणि मुलगा जिंकून आले नाहीत. पण, भाजपसोबत लग्नगाठ बांधली आणि यश मिळवले. अजित पवार यांनी स्वबळावर लढून दाखवावे असे आवाहनही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले.
हेही वाचा: राजन साळवींचा ठाकरेंना राम राम?
काय म्हणाले होते अजित पवार?
काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निकांलांबदद्ल आश्चर्य व्यक्त केले होते. निकाल अनाकलनीय असल्याचं म्हणताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून येण्यावर त्यांनी शंका उपस्थित केली होती. राज ठाकरेंच्या याच शंकेला अजित पवारांनी तोडीसतोड उत्तर दिले. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो, असे अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते.