Sunday, September 08, 2024 08:40:59 AM

sanam khan nikah
ठाण्याची सनम, भारताशी बेवफा

ठाण्यातील तरूणीची सोशल मीडियावरून पाकिस्तानातील तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर तिने बनावट कागदपत्र बनवले अन् ही ठाण्यातील तरुणी थेट पाकिस्तानात पोहोचली आहे.

ठाण्याची सनम भारताशी बेवफा 
sanam khan

२४ जुलै, २०२४ ठाणे: ठाण्यातील तरूणीची सोशल मीडियावरून पाकिस्तानातील तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर तिने बनावट कागदपत्र बनवले अन् ही ठाण्यातील तरुणी थेट पाकिस्तानात पोहोचली आहे. 

नेमकं काय घडलं ?

ठाण्याच्या वर्तकनगरमधील नगमा नूर मकसूद अली हिची इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानमधील तरूणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मग या दोघांनी भेटायचं ठरवलं. पण हे दोघेही वेगवेगळ्या देशात राहत होते. नगमा नूर मकसूद अली ही ठाण्यात होती तर तिचा प्रियकर पाकिस्तानात होता. मग नगमाने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. नगमाने तिचं नाव बदलत सनम खान केलं. आता सनम खान या नावाने तिने बनावट कागदपत्र तयार केले. पासपोर्ट आणि व्हीजा पण तिने तयार केला. याच कागदपत्रांच्या आधारे ती तिच्या मुलीला घेऊन पाकिस्तानमध्ये गेली.

नगमा कशी पोहोचली पाकिस्तानात ?

ठाण्यातील नगमा नूर मकसूद या तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद इथं ती पोहोचली. तिथं जावून नगमाने तिच्या प्रियकराशी लग्न केलं. पाकिस्तानमधील रावलपिंडी या भागात दीड महिने नगमा राहिली. १७ जुलैला पुन्हा भारतात आली. भारतात परत आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ही तरुणी आली ठाणे पोलिसांना हे कळताच त्यांनी या तरुणीला बोलावून चौकशी सुरु केलीये.

कोण आहे नगमा ?

नगमा नूर मकसुद अली उर्फ सनम खान असं या तरुणीचे नाव आहे. हे सगळं मे 2023 ते 2024 या काळात घडलं आहे. पोलिसांनी आता ठाण्यातील नगमा नूर मकसूद उर्फ सनम खान हिला ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरु आहे. ठाणे पोलीस सध्या नगमा नूर मकसूदच्या नातेवाईकांचाही तपास करत आहेत.

'सगळी कागदपत्रे खरी आहेत'

दरम्यान, या मुलीच्या आईने पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. 'माझ्या मुलीने कोणतीही चूक केली नाही, सर्व कागदपत्रे खरी आहेत', असा दावा नगमाच्या आईने केला आहे. 


सम्बन्धित सामग्री