Thursday, September 19, 2024 07:54:21 PM

s t workers protest
एस टी कर्मचाऱ्यांच घंटानाद आंदोलन

अमरावतीत पश्चिम विदर्भातील एस टी कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं आहे. तसेच ९ ऑगस्टपासून  बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

एस टी कर्मचाऱ्यांच घंटानाद आंदोलन

२९ जुलै, २०२४, अमरावती : अमरावतीत पश्चिम विदर्भातील एस टी कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं आहे. तसेच ९ ऑगस्टपासून  बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ९ ऑगस्टपासून लालपरीची वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. 


काय आहेत प्रमुख मागण्या ?

१) कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे.

२) महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करावी

३) रु.४८४९/- कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा.

४) मुळवेतनात दिलेल्या रु.५०००/-, ४०००/-, २५००/- मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट रु.५०००/- द्या.

५) एस.टी. कर्मचारी आणि कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा त्वरित सुरु करा.
 


सम्बन्धित सामग्री