Thursday, February 06, 2025 02:53:30 AM

Rohit Pawar helped the child
आईच्या ऑपरेशनसाठी रोहित पवारांनी केली लहानग्याला मदत

आमदार रोहित पवार यांनी आईच्या ऑपरेशनसाठी छोट्या मुलाला मदत केली आहे.

आईच्या ऑपरेशनसाठी रोहित पवारांनी केली लहानग्याला मदत

मुंबई : सध्या आमदार रोहित पवार यांचा व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी आईच्या ऑपरेशनसाठी छोट्या मुलाला मदत केली आहे. सोमवारी एक मुलाने आपल्या आईच्या ऑपरेशनच्या संदर्भात मदत मागण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हा अजित पवार यांनी सुद्धा तत्परतेने त्या चिमुकल्याला मदत केली. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

उपमुख्यमंत्री पवारांच्या मदतीच्या पाठोपाठ आता या चिमुकल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील मदतीचा हात दिला आहे. त्या छोट्या मुलाच्या आईच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ कॉल करून मुलाशी संवाद साधला. या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : नाव न घेता दरेकरांचा गोगावलेंना टोला

काय म्हणाले रोहित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनीही एका छोटया मुलाला त्यांच्या आईच्या ऑपरेशनसाठी मदत केली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ कॉल करून चिमुकल्याशी संवाद साधला आहे. चिमुकल्याशी बोलताना त्याच्या आईची विचारपूस रोहित पवार यांनी केली. त्याचबरोबर आईसाठी सगळेच करतात पण  एवढ्या लहान वयात त्यांने आईसाठी केलेली धडपडीचे कौतुक त्यांनी केले आहे. तसेच त्या मुलाला खूप मोठा हो आणि काही लागलं तर सांग असं रोहित पवारांनी सांगितले आहे. त्यानंतर त्या मुलानेही त्यांचे आभार मानले आहेत. 


सम्बन्धित सामग्री