नाशिक : गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाणी बाबत पुन्हा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी आदेश दिले आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोदावरी नदीत थेट सांडपाणी जात असल्याने गोदावरी अधिक प्रदूषित होत आहे. जिथून सांडपाणी मिसळले जात आहे. ते ठिकाण शोधून सविस्तर आराखडा तयार होणार आहे. या आधी अनेक उपाययोजना करून देखील गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.