Saturday, September 07, 2024 10:15:04 AM

Ravsaheb Danve Interview
विशेष मुलाखत - रावसाहेब दानवे

मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

विशेष मुलाखत - रावसाहेब दानवे 
ravsaheb danve

२३ जुलै, २०२४, मुंबई : मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार?, दानवे यांचे पुनर्वसन कोण करणार?, मराठे कुणाला मतदान करणार?, जरांगे यांना रावसाहेब दानवे घाबरलेत?, मराठा आरक्षण आंदोलन भरकटले आहे?, जरांगे भाजपाच्याच विरोधात का? या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 


काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

'आमचीच सत्ता येणार, दुमत नाही'
'आम्ही बहुमतातच आहोत, विरोधकांनी हुरुळू नये'
'नेतृत्व कोणाचं हे ठरायला वेळ आहे'
'राज्याचा मुख्यमंत्री कोणा एका समाजाचा नसतो'
'मतदाराची विभागणी जातीत करणे योग्य नाही'
'निवडणूका कधी विकासावर, कधी भावनेवर होतात'
'लोकसभेतला जनादेश विधानसभेत राहिल असं नाही'
'अर्थसंकल्पातून जनहिताच्या योजना जाहीर'
'दोन लाख नाही दहा लाखांनी पुढे जाऊ'
'शरद पवार, राहुल गांधींनी जाहीरपणे भाजपाचा विरोध केला'
'भाजपाला मतदान करु नका म्हणून सांगितलं'
'तरिही जनतेनं भाजपाला मतदारांनी कौल दिलाच'
'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे'
'आरक्षणाचा लढा १९८० पासून सुरु आहे'
'फडणवीसांच्या काळात २०१४ ला आरक्षण दिलं गेलं'
'उद्धव यांच्या काळात मात्र आरक्षणाला ताकद मिळाली नाही'
'पक्षानं आदेश दिला तर सरपंचसुद्धा होईन'
'टोपे आणि मी राजकीय विरोधक'
'शरद पवारांनी मोडतोड करुनच सरकारं आणली'
'स्वत:च्या हिंमतीवर सरकार आणणं पवारांना जमलं नाही'
'शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करु शकतील'

'पवारांच्या आवडीचा मुख्यमंत्री नसेल तर ते भाजपाकडेही येतील'
'मविआतला प्रत्येक पक्ष मुख्यमंत्रीपदाचा दावेदार'
'महायुतीच अशी कोणतीही दावेदारी नाही'
'शिंदे, फडणवीस, पवारांमध्ये कोणतेही वाद नाहीत'


सम्बन्धित सामग्री