Monday, February 10, 2025 03:10:50 PM

Raut's claim of black magic on Varsha bungalow
वर्षा बंगल्यावर काळी जादू केल्याचा राऊतांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अद्याप वापरण्यास सुरूवात न केल्यामुळे विरोधकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

वर्षा बंगल्यावर काळी जादू केल्याचा राऊतांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अद्याप वापरण्यास सुरूवात न केल्यामुळे विरोधकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. अन्य कोणी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी टिकी नये यासाठी बंगल्यात जादूटोणा केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. पुरोगामी महाराष्ट्रात जादू-टोणा, काळी जादू आणि लिंबू-टाचण्यांची चर्चा होणं,त्यावर आरोप-प्रत्योरोप व्हावेत ही बाब महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. मात्र, राजकीय हिशेब चुकते कऱण्यासाठी विरोधकांकडून अशी विधाने करून एकमेकांवर चिखलफेक केली जातं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत, बंगल्याच्या लॉनमध्ये मंतरलेल्या रेड्याचे शिंग पुरलं आहे असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  तसेच राशपचे अनिल देशमुख यांनी बंगल्यावर काळी जादू झाली असावी म्हणून मुख्यमंत्री गेले नसावेत असा अंदाज वर्तवला आहे. दोन दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर तेथे टोपलीभर लिंबू मिळाल्याचे सांगितलं होतं, त्यावर राऊतांनी शिंगे पुरल्याचा पलटवर केला.

हेही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णय

 

काय म्हणाले होते रामदास कदम?

उद्धव यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू मिळाले होते
काळी जादू काय ते उद्धव यांना विचारलं पाहिजे
मातोश्रीवर त्याचा अनुभव जास्त असेल
म्हणून त्यांच्या डोक्यात हे असं असावं

हेही वाचा : Ladki Bahin: 'या' लाडक्या बहिणीचे अर्ज योजनेतून नाव वगळण्यात येणार

 

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राऊतांना एवढं गांभिर्याने घेवू नका असा उपरोधिक टोला लगावला आहे. या आरोपांवर  माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना अशा गोष्टींचा अनुभव असल्याचे सांगत अधिक बोलणं टाळलं आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अद्याप राहायला गेले नाहीत हा मुद्दा राजकीय होवू शकत नाही. मात्र, विरोधकांकडून महायुतीतील नेत्यांमध्ये अस्थिरतेचे आणि संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री