२० ऑगस्ट, २०२४, कल्याण : बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा रेल्वेलाही चांगलाच फटका बसला आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने नागरिकांनी ठिय्या देत रेलरोको केला आहे. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यास आंदोलकांनी नकार दिला. यामुळे बदलापूरहून कर्जत आणि सीएसएमटी दोन्ही दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ठप्प झाल्या होत्या. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण ?
बदलापूर येथील एका नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात ४ आणि ६ वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. या शाळेतील व्यवस्थापनाविरोधात बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला होता. त्यानंतर शाळेची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. शाळेनेही संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. तसेच, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलक करत आहेत.