२० ऑगस्ट, २०२४, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात १० दिवसांनंतर जोरदार पावसानं काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळाले तर, हयातनगर भागातील काही पिकांना फटका बसला. गेल्या दहा दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, हयातनगर भागात जोरदार पाऊस बरसल्यानं ऊस, सोयाबीन, तुर, मुग असा पिकांना फटका बसला आहे. जोरदार पावसामुळे ऊसाचं पिक जमीनदोस्त झाले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.