Tuesday, January 28, 2025 09:33:03 PM

Pune Zilla Parishad action against schools
पालकांनो, 'या' शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका !

पुणे जिल्हा परिषदेकडून शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात ४९ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत.

पालकांनो या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका
pune palika

२३ जुलै, २०२४ पुणे : पुणे जिल्हा परिषदेकडून शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात ४९ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. या ४९ अनधिकृत शाळांपैकी १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर, १० शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बंद केलेल्या शाळांची नावे -

१. किड्जर्जी स्कुल, शालीमार चौक दौंड

२. जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड

३. यशश्री इंग्लिश मिडीयम स्कुल सोनवडी, दौंड

४. भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कुल मोई, खेड

५. संस्कृती इंटरनॅशनल स्कुल, आंबेगांव खुर्द, हवेली

६. श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी

७. रिव्हस्टोन इंग्लिश मिडीयम स्कुल, पेरणे फाटा

८. सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल, फुरसुंगी

९. श्रेयान इंटरनॅशनल स्कुल साईनगर गहुंजे, ता. मावळ

१०. व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगांव, ता. मावळ

११. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल, कासारवाडी

१२. श्री. चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कुल विशालनगर, पिंपळे निलख 

१३. केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कुल, महंमदवाडी रोड, हडपसर