Tuesday, September 17, 2024 01:06:14 AM

pune flood panchnama
पूरग्रस्त घरांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पूरग्रस्त घरांचे पंचनामे अंतिम टप्प्यात
pune flood

२९ जुलै, २०२४, पुणे : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड येथील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीनंतर राज्य शासनाने नागरिकांचेच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तहसील कार्यालयातून काम सुरू झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्येही अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. पिंपरी तहसील कार्यालयाकडून सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवारपर्यंत साडेतीन हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे. 

        

सम्बन्धित सामग्री