Sunday, September 08, 2024 08:46:10 AM

Protest of Shirdi villagers in front of Sai temple
साई मंदिरासमोर शिर्डी ग्रामस्थांचे आंदोलन

साई मंदिरासमोर शिर्डी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. साईसंस्थानच्या कारभाराविरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

साई मंदिरासमोर शिर्डी ग्रामस्थांचे आंदोलन
shirdi protest

२४  जुलै,२०२३ शिर्डी : साई मंदिरासमोर शिर्डी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. साईसंस्थानच्या कारभाराविरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर ठिय्या मांडला आहे. साई नामाचा जयघोष करत शिर्डी ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे. साई भक्तांच्या सुविधा आणि ग्रामस्थांच्या विविध मागण्यांकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेत नसल्याने शिर्डी ग्रामस्थ साई संस्थानाविरोधात संतापले आहेत. 

काय आहेत शिर्डी ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ?

१) साईभक्तांच्या सुविधेसाठी मंदिराचे सर्व गेट येण्या - जाण्यासाठी तातडीने खुले करावेत. 
२) अतिरिक्त सुरक्षा रक्षकांमुळे साईभक्तांना आणि ग्रामस्थांना होणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. 
३) वयोवृद्ध तसेच दिव्यांग साई भक्तांना सर्व गेटने येण्या जाण्याची सुविधा करावी.
४) CISF अथवा अन्य सुरक्षा यंत्रणेबाबत साई संस्थानने ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय करावे.
५) साई भक्तांच्या सुविधेसाठी सर्व गेटवर चप्पल स्टॅन्ड तसेच लॉकर्स उभारावेत. 
६) सर्व ग्रामदैवतांचे दर्शन सुलभतेने व्हावे.

        

सम्बन्धित सामग्री