Wednesday, January 01, 2025 07:04:50 AM

Ratnagiri
प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगचे दुसरे पर्व होणार

प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगचे दुसरे पर्व (PKPL 2025) होणार आहे.

प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगचे दुसरे पर्व होणार

रत्नागिरी : प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्स आयोजित प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगच्या पहिल्या अभूतपूर्व यशानंतर 2025 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या पर्वासाठी (PKPL 2025) साठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. PKPL च्या पहिल्या पर्वामध्ये संघ मालक अक्षय अंनत मानगेकर यांचा मानगेकर शूटर्स हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

आता पुन्हा एकदा तीच आतुरता आहे. PKPL पर्व 2 चा दावेदार कोण? याची उत्सुकता आहे. सदर स्पर्धेचे आयोजन येत्या 24 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले आहे. लीगमध्ये एकूण 12 संघ मालक व 168 खेळाडू असणार आहेत.

हेही वाचा : IPL 2025 आधीच KKR च्या समस्या वाढल्या, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

PKPL च्या दुसऱ्या पर्वासाठी आकर्षक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक 30 हजार व आकर्षक वर्ल्ड कप प्रतिकृती असणारी ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर द्वितीय पारितोषिक 25 हजार व आकर्षक ट्रॉफी तसेच तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. अन्य बक्षिसे देण्यात येणार असून त्यामध्ये सायकल, कूलर, फॅन, परपल कॅप, ऑरेंज कॅप, शूजबॅट, मेडल्स, ट्रॉफी यांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुकातील प्रभानवल्ली गावात होणार आहे. प्रभानवल्ली गावातील वाघजाई मंदिर या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री